"अखंड सेवा, सक्षम नागरिक"

आमची यशोगाथा

न्याहाळे खुर्द   हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले  प्रगतशील व ऐतिहासिक गाव आहे.न्याहाळे खुर्द  गावात पश्चिममुखी हनुमान मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू आहे न्याहाळे खुर्द  या गावाला पूर्वी लहांगेची वाडी असेही संबोधले जात होते, सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे ३७३१ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ६, अंगणवाडी केंद्रे ७ व व्यायामशाळा ३,सभामंडप-२ अशी शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच  गावात अहिल्याबाई होळकर यांचे पुरातन बारव असून  तसेच  गावात हिरोबा दैवत प्रमुख माणला जातो. तसेच प्रत्येक गाव पाड्यात मंदिरे आहेत. सामुदायिक सभागृह, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात, नागली,वरी, उडीद, तूर,खुरसानी,कुळीत व ज्वारी ही प्रमुख पिके घेतली जातात. भात,वरी या पिकांच्या लागवडीमुळे गावातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते,तसेच दुग्ध व्यवसाय करतात

न्याहाळे खुर्द ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत न्याहाळे खुर्द गावाने संपूर्ण खुले शौचमुक्त (ODF प्लस) दर्जा मिळवला आहे. जलसंधारण व  पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान मध्ये  न्याहाळे खुर्दला विशेष गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासन पुरस्कुत तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत सन २००५-२००६ पारितोषिक प्राप्त गाव बक्षीस रुपये-५ लक्ष रुपये  प्राप्त झाला असून स्वच्छता अभियान पुरस्कारही जिल्हा व तालुका  पातळीवर मिळाला आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व १२ सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणतात. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात. न्याहाळे खुर्द गाव आज जव्हार तालुक्यातील एक आदर्श व सर्वांगीण विकासाकडे वाटचाल करणारे गाव म्हणून ओळखले जाते.

भौगोलिक स्थान

न्याहाळे खुर्द हे गाव जव्हार तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर वसलेले आहे. गावाचे एकूण लागवडी योग्य  क्षेत्रफळ ५४२चौ.कि. हे आर  असून ग्रामपंचायतीमध्ये ४ वार्ड आहेत. एकूण १२४० कुटुंबे येथे वास्तव्यास असून, लोकसंख्या ३७३१ आहे. त्यामध्ये १८०२पुरुष व१९२९ महिला यांचा समावेश होतो.

लोकजीवन

न्याहाळे खुर्द गावाचे लोकजीवन साधे, श्रमप्रधान व पारंपरिक आहे. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून, भात, नागली,वरी, उडीद, तूर,खुरसानी,कुळीत व हंगामी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. शेतीसह काही लोक दुग्धव्यवसाय, यामध्येही कार्यरत आहेत.

गावात विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक परंपरा जोपासल्या जातात. वर्षभरात होणारे उत्सव, सण आणि गावात भरवला जाणारा साप्ताह गावाच्या एकतेचे दर्शन घडवतो. गणेशोत्सव, होळी, दिवाळी, नवरात्र तसेच स्थानिक देवतांच्या पूजांना विशेष महत्त्व आहे.

येथील लोक मेहनती, मदतशील व अतिथी देवो भव  या विचाराने वावरणारे आहेत. स्त्रियांचा सहभाग ग्रामविकास व स्वयंसाहाय्य गटांद्वारे मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तरुण वर्ग शिक्षण, खेळ आणि रोजगाराच्या संधी शोधत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

न्याहाळे खुर्द च्या लोकजीवनात पारंपरिक ग्रामीण संस्कृतीसोबतच आधुनिकतेची झलकही दिसते, ज्यामुळे गावाचा विकास आणि एकात्मता दोन्ही जोपासले जातात.

प्रशासकीय संरचना


भारतातील पंचायती राज हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य प्रणालीचे प्रतीक आहे.

जन्म, मृत्यू व विवाह यांची नोंदणी अवश्य करा...

लोकसंख्या आकडेवारी


1240
3731
1802
1929

Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo
Logo